प्रतिनिधी पातुर :-(संगीता इंगळे)
पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकरी यांच्या राहत्या घरात शुक्रवारी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान अचानक गावालगत असलेल्या शेतातून 20 रानडुकरांचा झुंड गावात आला गावातील मम्मू शहा यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असताना रानडुकरांचा झुंड त्यांच्या घरात घुसला घरात असलेली मम्मू शहा यांची पत्नी व दहा वर्षाचा मुलगा घाबरून बाहेर पडले असता त्यांच्या मुलाला रानडुकराच्या झुंबळीत किरकोळ दुखापत झाली.

नंतर त्यांनी घराचा दरवाजा बंद करून घेतला आणि अंदाजे 20 रानडुकरे घरातच होते घरातील अन्नधान्य व उपयोगी वस्तूची नासधूस 60 ते 70 हजाराचे नुकसान झाले आहे.

त्यामुळे पिंपळखुटा गावात एकच तारांबळ उडाली आणि गावकऱ्यांची पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली नंतर वन विभाग आलेगाव यांना पूर्ण माहिती देण्यात आली.काही वेळानंतर वन विभागाचे कर्मचारी गावात आले.प्रवीण भागवत मळसुर,वनपाल श्रीमती वलवे , श्रीमती इंगळे ,बावस्कर,वनरक्षक पुरुषोत्तम गिरे,रामचंद शेलार शो,श्रीकांत शेलार,सचिन शेलार,बबलू तेलगोटे,माहोरे,मधुकर राठोड,गौतम सरकटे,पवन डावखरे,शाम राठोड,मधुकर राठोड,स्वप्निल,रमेश यांनी घराची पाहणी करून गावकरी व बाहेर गावचे आलेले चांगेफळ राहेर व,अडगाव या सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने घरात घुसलेल्या रानडुकराला जाळीच्या साह्याने घरातील एकूण 14 रानडुकरे सुरक्षित पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.या रानडुकराच्या धरपकड करण्याची रेस्क्यू चे काम तीन ते चार तास चालले असता घरात घुसलेल्या रानडुकरांनी मम्मू शहा यांच्या घरातील खूप नुकसान केले.त्यामध्ये ज्वारी,गहू,तुर पेरणीसाठी आणलेले भुईमुगाचे बियाणे हरभरा,असे बरेच अन्नधान्य व जीवन आवश्यक लागणाऱ्या वस्तू फ्रिज कपाट कुलर भांडे कपडे असे अंदाजे 60 ते 70 हजाराचे नुकसान केले.हे नुकसान वन विभागाने पंचनामा करून मम्मू शहा यांना वनविभागाकडून जास्तीत जास्त मदत मिळावी असे सर्व पिंपळखुटा गावकऱ्यांचे मत व्यक्त केले.या रेस्क्यू करतेवेळी लोकांची खूप गर्दी झाल्यामुळे चान्नी पोलीस घटनास्थळी हजर झाले व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.
प्रतिक्रिया… माझ्या घरात रानडुकराचा झुंड घुसल्यामुळे माझे मोठे नुकसान झाले आहे खाण्यापिण्याच्या सामानाची नासधूस झाली माझ्यावर आता उपासमारीची वेळ आली असून मला वन विभाग संबंधित यांनी मला लवकरात मदत द्यावी…
मम्मू शहा
प्रतिक्रिया… पिंपळखुटा येथून आम्हाला माहिती मिळताच आम्ही तेथे पोहोचलो आणि गावकऱ्यांच्या साह्याने सुरक्षितपणे 14 रानडुकराचा रेस्क्यू केले.प्रवीण भागवत वनपाल मळसुर यांची प्रतिक्रिया
