पातूर दि 01/01/2024
कोवीड -19 व JN-1 सब व्हेरिएंट च्या संभाव्य धोक्यामुळे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान (AIIA),आयुष मंत्रालय कडून इम्युनुटी बुस्टर म्हणून *स्वास्थ रक्षा व आयु रक्षा किट* अशा दोन प्रकारच्या किट डेव्हलप केल्या आहेत.

संभाव्य कोरोना व्हेरियंट च्या धोक्या विरुद्ध हि किट कवच म्हणून काम करेल असे सांगितले जाते. हि किट 16 वर्षा पासून पुढील वयोगटातील पुरुष व महिलां साठी इम्युनिटी बूस्टर म्हणून कार्य करेल. *AIIA आयुष मंत्रालयाच्या दिल्ली* यांच्या निवेदनानुसार कोरोना विरुद्ध लढाईत भारत प्रत्येक येणाऱ्या संभाव्य धोक्या विरुद्ध लढत आहे.यासाठी देशात मोठा व्हॅक्सिनेशन प्रोग्राम आयोजित केला होता.परंतु सध्या येणाऱ्या सब व्हेरीयंट दुष्परिणामापासून दूर राहण्यासाठी या किटचा उपयोग होईल. शासनाच्या या *स्वास्थ रक्षा व आयुरक्षा* किट मुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढणे,आजारापासून संरक्षण, वात रोग,शुक्रदोष,मूत्ररोग, त्वचारोग,ऊर्जा वर्धक,स्मृतिवर्धक पचनशक्ती सुधारणे,सर्दी, श्वास,खोकला यांचा प्रादुर्भाव कमी करणे असे अनेक फायदे या मुळे होतात. महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनातर्फे डॉ व.ज. ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय येथे या किटचे वितरण करण्याचे आयोजन केलेले आहे याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेऊ शकतात.असे प्रशासक डॉ.शेख साजिद,प्राचार्य डॉ जयश्री काटोले,डॉ अभय भूस्कडे डॉ.दिलीप अतकर(MO)उप-अधीक्षक डॉ.वसीम यांनी जाहीर केले.