पातुर प्रतिनिधी :- शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडून विद्यार्थ्यांनी दिला आदर्श प्रचाराच्या तोफांना वेग आला,विद्यार्थ्यांचा आनंद शिगेला गेला.

स्थानिक स्वराज्य संस्था नगरपालिका, महानगरपालिका,जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूकिचे डोहावळे सर्वांना लागलेले आहेत.अशातच पातुर येथील एज्युवीला पब्लिक स्कूल मध्ये विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रित्या निवडणूक प्रक्रिया पार पाडली.निवडणूक प्रक्रिया कशी असते? आदर्श आचारसंहिता कशी पाळली जाते? आवेदन पत्र कसे भरतात? त्यावर सूचक अनुमोदक यांचे काय महत्त्व आहे? आवेदन पत्र रद्द कसे होतात? प्रचार सभेमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे असतात? प्रत्यक्ष निवडणूक कशी होते?त्याचबरोबर मतमोजणी आणि त्यावरील आक्षेप, आक्षेपांचे निरासरन व अंतिम निकाल याबाबत एज्यूविला पब्लिक स्कूल पातुर मध्ये प्रत्यक्ष बॅलेट पेपरवर निवडणुका घेत विद्यार्थ्यांना लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव निवडणुकीचे बाळकडू शालेय जीवनापासूनच दिले जात आहे.इयत्ता पहिली पासून पुढील 390 पैकी 375 विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावत आपले वर्ग प्रतिनिधी निवडले विजयी उमेदवार खालील प्रमाणे

काव्या विशाल खंडारे,उत्कर्ष विजय वानखडे,
सान्वी विनय खंडारे,हर्ष अमोल बर्डे,
तन्वी रणजीत डोंगरदिवे,संविधान प्रवीण हाडके,
अधिरा नितीन कढोणे,देवांश विजय फाटकर,
काव्या रविकुमार खांबलकर,श्रवण पूजेश गोळे,कीर्ती सुरेंद्र तायडे,वेदांत संदीप शेंडे,अनन्या मनीष काळपांडे प्रणित महेश काळपांडे,आराध्य अशोक गहिले राहुल विष्णू इंगळे,रूतिका सुभाष बळकर,रुद्र विनायक चापाईतकर.विजय उमेदवारांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले.निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरता मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून मुख्याध्यापिका विद्या गाडगे यांनी तर प्रिसायडिंग ऑफिसर म्हणून नीता ढोणे ठाकरे,पूजा पाटील,नेहा अत्तरकार,पूजा देशमुख, स्नेहल काळपांडे, विजया वाडेकर,सुषमा इनामदार उमाळे,नागसेन इंगळे व प्रवीण पाचपोर यांनी कर्तव्य बजाविले.निवडणुकीमध्ये पराजित उमेदवारांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आपल्यामधील खिलाडू वृत्तीचे प्रदर्शन सर्वांसाठी कौतुकास्पद होते.निवडणुकी दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये याकरिता इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.