पातुर प्रतिनिधी वाढत्या तापमानामुळे पाण्याची पातळी खोल गेल्याने वापराच्या पाण्यात भीषण टंचाईला नागरिक जाणवत आहे गेल्या दोन महिन्यापासून पातुर शहराला लागून असलेली बोर्डी नदीपात्र कोरडे झाल्याने पातुर शहरातील विहिरीची पातळी खोल गेली आहे पातुर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर पातूर तलाव असून हा पातूर तलाव 70 टक्के पाण्याने भरला आहे. या पातुर तलावाखाली 125 हेक्टर जमीन सिंचनाखाली असते परंतु यावर्षी शेतकऱ्यांनी फक्त 20 हेक्टर जमीनच सिंचन केले. या तलावाचे 15 टक्के पाणी हे पातुर शहरा करिता आरक्षित केले आहे. वाढत्या तापमानामुळे पातुर शहरातील गोंडवेस, देवळी मैदान ,किल्ला परिसर, राम नगर, फैमुद्दीन नगर, कशीद पुरा , गुरुवार पेठ, मिलिंद नगर, समीप प्लॉट, गुजरी लाईन, खडकेश्वर वे, मुजावरपूरा या भागातील विहिरीची व हातपंपाच्या पाण्याची पातळी खोलीवर गेली असल्याने नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई होत आहे पातुर शहरात गेल्या नऊ दिवसानंतर नळाचे पाणी मिळते हे पाणी नागरिक पिण्याकरिता उपयोगात आणतात व घरगुती वापराकरिता विहिरीचे पाणी वापरतात परंतु विहिरी कोरड्या झाल्याने नागरिकांना पाण्याकरिता अतोनात त्रास सहन करावा लागत आहे याबाबत लोकप्रतिनिधींना नागरिकांनी वारंवार पातुर तलावाचे पाणी सोडण्याची मागणी केली आहे परंतु अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे पाणी सोडण्यास विलंब होत आहे.
सिंचन विभाग अकोला यांना याबाबत दोन महिने अगोदर पत्र दिले असून पाणी सोडण्याच्या सूचना करण्यात आले आहे लवकरच नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल ! आमदार नितीन देशमुख