तेल्हारा दि.१२ (ता.प्र) इंदिरा नगर तेल्हारा येथील सभागृहात गुरुवार दि.११ एप्रिल २०२४ रोजी मुस्लीम समाजाच्या पवित्र रमजान ईद सणाच्या औचित्याने गजानन गायकवाड व मित्र परिवाराच्या विद्यमाने इप्तार पार्टी सोत्साह साजरी करण्यात आली.
तेल्हारा येथील इंदिरा नगरात पार पडलेल्या इप्तार पार्टी प्रसंगी रमजान ईदेच्या पुर्व संध्येला मुस्लिम बांधवाना फराळाचे वितरण करून हस्तांदोलन करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सर्वश्री गजानन उंबरकार, केशव ताथोड, गजानन नळकांडे,रवि गाडोदिया,अनुप मार्क, विजय देशमुख,गणेश इंगोले,गणी शहा सर,राजु खोडे,वासुदेव गावत्रे,अशोक गव्हाळे,कीसन खोडे,मनोज कनोजी,सुरेश सोनोने,लखन कनोजी,गणेश वानखडे,चेतन खोडे,मयुर चिमकर,राकेश बोरसे सह मदीना मज्जीद व मज्जीद ए अय्युब या दोन्ही मज्जीद मधील नमाजी व रोजा उपवास ठेवणारे मुस्लिम बांधव उपस्थीत होते.गजानन गायकवाड यांचा मित्र परिवार तसेच मुस्लीम समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकता मंडळाचे कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले.