पातूर येथील पत्रकार यांच्या कडून तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन…..
पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाईची मागणी…..

पातूर प्रतिनिधी
दैनिक सुफ्फाचे मुख्य संपादक सज्जाद हुसेन आणि त्यांच्या कुटुंबीयांवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ पातूर येथील पत्रकारांनी एकत्र येत जिल्हाधिकारी यांना तहसीलदार पातूर यांच्यामार्फत विविध मागण्यांचे निवेदन निवेदन सादर केले.दि.२९ जुलै २०२५ रोजी पोलीस विभागाच्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेचे कौतुक करणारी बातमी दैनिक सुफ्फामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती.परंतु या बातमीवर संतप्त झालेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दैनिक सुफ्फाच्या कार्यालयात घुसून संपादक सज्जाद हुसेन,त्यांचे कुटुंबीय व सहकारी यांच्यावर तलवार,चाकू व भाल्यांनी प्राणघातक हल्ला केला.या भीषण घटनेत चार पत्रकार गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेने संपूर्ण पत्रकारितेच्या क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून,प्रशासनाने तातडीने आणि कठोर पावले उचलावीत, अशी मागणी संघटनांनी निवेदनातून केली. तसेच, पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीसह विविध मागण्या करण्यात आल्या आहे.त्यामध्ये हल्ल्याच्या सर्व आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कारवाई करून पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी,अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी कायमस्वरूपी सुरक्षाव्यवस्था उभारावी.या वेळी पातूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश सरोदे,ज्येष्ठ पत्रकार उमेश देशमुख, मोहन जोशी,प्रदीप काळपांडे,अब्दुल कुद्दुस शेख,मोहम्मद फरहान अमीन,दुलेखा युसुफ खान,निखिल इंगळे,साजिद हुसेन,संगीता इंगळे,किरणकुमार निमकंडे,भावेश गिरोळकर, नजीम शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.