ब्रम्हकुमारी विशव विद्यालयाचा अभिनव उपक्रम
पातूर प्रतिनिधी : पातुर येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या वतीने किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल येथे रक्षाबंधन उत्साहात पार पडले.प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पातूरच्या वतीने रक्षाबंधन उपक्रमाचा शुभारंभ किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूल येथून करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राजपीता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय पातूरच्या संचालिका ब्रह्मलीन राजयोगिनी लीनादीदी ह्या होत्या.तर विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक जनार्दन ढोकणे हे होते.तर प्रमुख उपस्थिती म्हणून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे,बी.के.माधुरी उगले दीदी प्रामुख्याने उपस्थित होते.प्रास्ताविक मधून जनार्दन ढोकणे यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला.तर प्रमुख उपस्थित गोपाल गाडगे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा लीना दीदी यांनी रक्षाबंधन या उपक्रमाची सामाजिक भावना मांडली.यावेळी उपस्थित शिक्षक व कर्मचारी वृंदाना राख्या बांधून सामाजिक दायित्व याची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे यांनी तर आभार नितु ढोणे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,नरेंद्र बोरकर,नितु ढोणे, संकल्प व्यवहारे,हरिष सौंदळे,बजरंग भुजबटराव,अविनाश पाटील,अक्षय तायडे,प्रतीक्षा भारसाकळे,प्रियंका चव्हाण,पूजा खंडारे,रेश्मा शेंडे,इकरा आदिबा खान,साक्षी वानखडे,शुभांगी बोरकर,दिव्या गव्हाळे, नयना पटोणे,प्रिया चक्रे,गौरी अमानकर,रुपाली पोहरे,कल्पना वानेरे,सुकेशिनी वाहूरवाघ,शुभम पोहरे,मधुकर बोदडे आदींनी परिश्रम घेतले.