बाळापुर मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत नितीन देशमुख यांनी आपले विरोधक नातीकोद्दीन खतीब व बळीराम सिरस्कार यांच्या दणदणीत पराभव करून विजय प्राप्त करताच पातुर शहरासह ग्रामीण परिसरात नागरिकांनी मोठ्या आनंदात विजय आनंद साजरा करण्यात आला शिवसेना व महाआघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पातुर शहरात जल्लोष केला यावेळी उबाठा शिवसेना गटाच्या वतीने पातुर शहरात ढोल ताशांनी पदाधिकाऱ्यांनी भव्य अशी मिरवणूक काढली, राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस यांनी रात्री जुने बस स्थानक येथे आमदार नितीन देशमुख यांचा सत्कार करीत मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. तर ग्रामीण भागात नागरिकांनी आपापल्या गावात मिरवणुका काढून गुलाल उधळला
