स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांचं नेतृत्व मान्य करून आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात कार्यकर्त्यांचे एक जाळे विणले होते पण स्वर्गीय विनायक राव जी मेटे साहेब यांचे अपघाती निधन झाल्यामुळे पुढील कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या कामाची शैली पाहून तसेच ते राबवत असलेले निर्णय पाहून सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर माननीय शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता मागील वर्षी माननीय शिंदे साहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला होता माझ्यावर जिल्ह्याची सहसंपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी पण दिली होती पण शिवसेनेचे जिल्ह्यातील नेतृत्वच कमकुवत असल्यामुळे त्या ठिकाणी काम करायला फार अडचण जात होती कार्यकर्त्यांना न्याय दिला जाऊ शकत नव्हता त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी आता काहीतरी आपण योग्य तो निर्णय घ्यावा याबाबत वेळोवेळी सुचविले होते त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण काम केले पाहिजे अशी सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील नेतृत्व करणारे कार्य कुशल आमदार श्री अमोलजी मिटकरी साहेब यांचे सुद्धा नेतृत्व जिल्ह्यात एक रुजत असताना त्यांना आपण साथ देऊन दोघे मिळून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधणी केली पाहिजे या निर्णयावर कार्यकर्ते ठाम झाले त्यामुळे माननीय नामदार श्री अजितदादा पवार साहेब माननीय खासदार श्री सुनीलजी तटकरे साहेब माननीय शिवाजीराव गरजे साहेब माननीय तुकारामजी अंभोरे पाटील साहेब माननीय सुरजजी चव्हाण साहेब माननीय श्री उमेशजी पाटील साहेब यांच्या उपस्थितीत तसेच आमदार श्री अमोलजी मिटकरी साहेब यांच्या नेतृत्वात मुंबई येथे प्रवेश घेतला यावेळी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करू असा शब्द माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांनी दिल्यामुळे यापुढे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकट करण्याचं काम करू सर्वांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्ह्यात नंबर एक वर जाईल याकरता प्रयत्न करू.
