दिनांक ०२.०१.२०२४
आज दिनांक ०२.०१.२०२४ रोजी अकोला जिल्हयाचे नविन पोलीस अधिक्षक मा. बच्चन सिंह यांनी मा.पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांचे कडुन अकोला जिल्हा पोलीस दलाचा पदभार मध्यानानंतर स्विकारला. मा. बच्चन सिंह हे २०१३ बॅचे चे आय.पी.एस. अधिकारी असुन ते मुळ उत्तर प्रदेशातील आहे. त्यांचे शिक्षण हे ईलोक्ट्रॉनिक्स टेलिकॉमिनिकेशन मध्ये बॅचलर ऑफ इंजिनिअरींग झालेले असुन त्यांनी आय. आय. एम. बॅगलोर येथुन मार्केटिंग मध्ये एम.बी.ए. केल्यानंतर त्यांनी खाजगी क्षेत्रामध्ये काम करित असतांना ते यु.पी.एस.सी. ची परिक्षा यशस्वी होवुन ते माहे सप्टेंबर २०१३ मध्ये आय. पी. एस. म्हणुन रूजु झाले. त्यांचा परिविक्षाधीन कालावधी हा ठाणे ग्रामीण हया जिल्हयात झालेला आहे.

त्यांची पहिली पोस्टींग सहा. पोलीस अधिक्षक (ASP) म्हणुन पैठण जिल्हा औरंगाबाद (सप्टेंबर २०१५ ते एप्रील २०१७) येथे झाली. त्यानंतर सन २०१७ ते ऑगस्ट २०१८ मध्ये पदोन्नतीवर अप्पर पोलीस अधिक्षक (Add.SP) म्हणुन जळगाव जिल्हयात कामकाज केले. जुलै २०१९ ते फेब्रु २०२१ पर्यंत DCP पुणे झोन २ येथे काम केले.त्याचदरम्यान DCP क्राईम ब्रँच पुणे शहर येथे कामकाज पाहिले. दिनांक २० सप्टेंबर २०२१ ते २४ नोव्हेंबर २०२३ पावेतो त्यांनी वाशिम जिल्हा पोलीस अधिक्षक म्हणुन कामकाज केले. त्यानंतर आज दिनांक ०२/०१/२०२४ रोजी त्यांनी अकोला जिल्हा पोलीस दलाचे पोलीस अधिक्षक म्हणुन पदभार स्विकारला. त्यांना राष्ट्रीय / आंतराष्ट्रीय चालु घडामोडी, माहिती तंत्रज्ञान, मानसशास्त्र या विषयांमध्ये विशेष रूची असल्याचे समजले. पहिल्याच दिवशी शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, शाखा अधिकारी, सर्व ठाणेदार यांची प्रत्यक्ष बैठक घेतली तर ग्रामीण भागातील सर्व ठाणेदार यांना व्हिडीओ कॉन्फ्रसिंग द्वारे बैठकिला हजर होते. सदर बैठकिला जिल्हयाचे उपलब्ध मनुष्यबळ, साधन सामुग्री यांचा आढावा घेण्यात येवुन कायदा व सुव्यवस्था राखण्याचे दृष्टीने महत्वपुर्ण सुचना देण्यात आल्या.