नऊ वर्षीय बालिकावर अत्याचार करणाऱ्या नाराधमास पातुर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता या नाराधमास न्यायालयाने 30 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राप्त माहिती अशी, की गुरुवार २६ डिसेंबर रोजी सायंकाळी पातूर पोलिस ठाणे अंतर्गत तालुक्यातील एका गावातील नऊ
वर्षीय मुलगी आपल्या घराजवळ बकरीच्या पिल्लांसोबत खेळत होती. बकरीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरले. त्या बकरीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुकली त्या घरामध्ये गेली असता घरात ५० वर्षीय व्यक्ती हजर होता. इतर कोणीही घरात नव्हते. त्यामुळे या नराधमाने या चिमुकलीला पकडून तिच्यावर अत्याचार केला. थोड्या वेळाने ही चिमुकली घरी पोहोचल्यानंतर तिला वेदना व्हायला लागल्या. तेव्हा तिने तिच्या आईला ही बाब सांगितली. आईने विचारपूस केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी लगेच पातूर पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पातूर पोलिसांनी पातुर ठाणेदार धोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली लगेच आरोपीला पकडण्यासाठी सूत्र हलवले परंतु तोपर्यंत आरोपी गावातून पसार झाला होता. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन गावापासून जवळच असलेल्या जंगलातून त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार ढोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजानन तडसे करीत आहेत .

Oplus_0