प्रतिनिधी - पातूर नगर परिषद हद्दीतील घरकुल,नळाचे पाणी व लीकेज पाईप लाईन ,स्ट्रीट लाईट या विषयावर नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सोबत सविस्तर चर्चा करण्यात आली,पातूर शहरातील नागरिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना 2.0 लवकरात लवकर सुरू करण्यासाठी पातुर भाजपाने आग्रह धरला आहे, लिकेज पाईपलाईन व गढूळ पाणी यासंदर्भात त्या त्या विभागाच्या अधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा करून नादुरुस्त पाईपलाईन लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावे, पातुर शहरातील स्ट्रीट लाईट व हाय मस्ट लाईट नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा करण्यात आली, या सर्व विषयावर तात्काळ मार्ग काढून सर्व सोयी सुविधा नियमित कराव्या वरील सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा भारतीय जनता पार्टी पातुर शहराच्या वतीने असे शुक्रवार दिनांक 27-12-2024 रोजी दिलेल्या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे, यावेळी उपस्थित म्हणून न.प.उपाध्यक्ष राजू उगले, अभिजीत गहलोत,गणेश गाडगे,संदीप तायडे,सचिन ढोणे,भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वैशालीताई निकम,वर्षाताई बगाडे,शीलाताई आवटे,सचिन बारोकार, सचिन बायस,डिगांबर गोतरकर,नवीन करंगाळे, निलेश फुलारी,विठ्ठल लोथे,अबुल हसन खा,दिलीप बगाडे,गजानन गुजर,हिरालाल चवरे,हर्षल ढोणे,दिलीप डोंगे,मनवर खा,सुनील पाटील,अमोल इंगळे,नीरज कुटे,प्रदीप फुलारी,सतीश तायडे,विष्णू उमाळे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा