पातुरः पातुर तालुक्यातील शिर्ला अंधारे येथील श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आज दि. ०६/१२/२०२३ ला भारतीय संविधानाचे जनक विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला असुन या कार्यक्रमा निमीत्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज, भाऊसाहेब डॉ. पंजाबराव देशमुख या महामानवांच्या प्रतिमांना दिपप्रज्वलीत करुन विनम्र अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे मा.प्राचार्य डॉ. राम खरडे हे होते तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे अध्यक्ष कृष्णाभाऊ अंधारे, मा. हेमलता अंधारे कार्यकारी सदस्य डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला, प्रा.डॉ. मंगला घनबहादुर डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला हया होत्या. कार्यक्रमा निमीत्त प्रमुख अतिथीनी भारतीय सविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन चरीत्रावर मनोगता मधुन प्रकाश टाकला या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्रा. रोहीत कनोजे प्रा. सागर भगत प्रा.पांडुरंग जाधव प्रा. सौरभ वर्मा प्रा. हर्षल पोरे प्रा. सोनल खवने प्रा. माधुरी खुळे ग्रंथपाल सौ. ज्योती घुगे श्री अशोक महल्ले सौ. सुनिता देशपांडे श्री. नितीन वाकोडे श्री. प्रितेश मंजुळकर श्री. श्रीकृष्ण आवटे श्री. अतुल जैन, सागर निंबोळे ,प्रमोद लांडकर, शुभम लोडम इत्यादीची उपस्थिती होती त्याचप्रमाणे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची मोठया प्रमाणात उपस्थिती होती या कार्यक्रमाची राष्ट्रगीताने सांगता करण्यात आली.