पातुर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मार्फत ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या योजनेअंतर्गत 6648 घरकुलांना मंजूरी मिळाली असून त्यापैकी 4474 कामे पूर्ण झाल्याची माहिती घरकुल योजना विभगा कडून देण्यात आली आहे. पातुर तालुक्यातील पीएम योजनेअंतर्गत 5219 रमाई योजनेमध्ये 486 शबरीमध्ये 657 तर मोदी आवास यामध्ये 286 घरकुल मंजूर झाली आहेत त्यापैकी आज पर्यंत ४४७४ घरकुल हे पूर्ण झाल्याची माहिती आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना घरकुल योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा याकरिता पातुर पंचयात समितीचे गटविकास अधिकारी श्री गजानन अगडते यांनी पाठपुरावा केला. ज्या लाभार्थींच्या घरकुलाच्या फायली अपूर्ण राहिल्या असतील त्या मंजूर फाईलाची (त्रुटी) पूर्तता करण्याचे आवाहन घरकुल योजना विभाग कडून करण्यात येत आहे ग्रामीण भागात दलालांचा सुळसुळाट सुटला असून नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केली आहे या फाईलची शासकीय पूर्तता व ऑनलाईन काम घरकुल योजने विभागाचे आतिश पवार, अनिल वाहोकार, रोशन ठाकरे, पवन बडे, चेतन गड, मंगेश राठोड हे काम पाहत आहेत