पातुर प्रतिनिधी:-
पातुर नगरपरिषद हद्दीतील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ घटकातील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळावे याकरिता भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पाठपुरावा करत आहेत. पालकमंत्री आकाश दादा फोन कर व तसेच खासदार अनुप कुमार धोत्रे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.

आता लवकरच गरजू नागरिकांचे आपल्या नवीन घराचे स्वप्न साकार होणार आहेत.भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने बरेच दिवसापासून प्रलंबित असलेली घरकुल योजना ही अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार आकाश दादा फुंडकर यांच्या पुढाकारामुळे व पातुर नगर परिषद चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सैय्यद ऐहसानोद्दीन यांच्या सहाकार्याने तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या पाठपुराव्यामुळे पातुर शहरातील गरजवंत नागरिकांना स्वतःच्या घराचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. पंतप्रधान आवास योजना घरकुल अर्जाची पडताळणी करून जिओ टॅग करण्यात आले आहे.त्यानुसार पंतप्रधान आवास योजना 2.0 अंतर्गत अर्जाची यादी व सविस्तर प्रकल्प अहवाल डी पी आर मध्ये समाविष्ट करून शासनाकडे पाठविण्यात आलेले आहे. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे नेते,तथा माजी उपाध्यक्ष नगर परिषद पातुर राजू उगले,व तसेच भारतीय जनता पार्टीचे
नवनिर्वाचित शहराध्यक्ष गणेश गाडगे यांनी दिली.