दिनांक २३/०३/२०२४ रोजी सकाळी पोलीस स्टेशन चान्नी परीसरात होळी सणानिमित्त अवैध दारू विकत्यावर मोठ्या प्रमाणात स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यवाही केली आहे. सस्ती येथे निगुर्णा नदी पात्रात प्रो रेड केली असता सस्ती येथील आरोपी कैलास दामोदर वानखडे, प्रशांत मोतिराम अंभोरे यांचे ताब्यात ४० लीटर गावठी हातभटटीची दारू किंमत ६०००/- रू तसेच २७ डब्यामध्ये २७० लिटर सडवा मोवा माच किंमत २७,०००/- रू असा एकुण ३३,०००/- चा माल मिळून आला. तसेच निगुर्णा नदी पात्रात प्रो रेड केली असता घटनास्थळावरून १५ लीटर गावठी हातभटटीची दारू किंमत २२५०/- रू तसेच १५ डब्यामध्ये १५० लिटर सडवा मोवा माच किंमत १५,०००/- रू असा एकुण १७, २५०/- चा माल मिळून आला आरोपी प्रविण मोतिराम अंभोरे रा सस्ती हा घटनास्थळावरून पसार झाला असुन आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचेवर पोलीस स्टेशन चान्नी येथे दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला –
तसेच आलेगाव परिसरातील डुक्कर थरा नाला येथे प्रो रेड केली असता आरोपी नामे शेख मोसिन शेख मुसा यांचे ताब्यात ०७ लीटर गावठी हातभटटीची दारू किंमत ७००/- रू तसेच ०६ टिन पत्राचे डब्यामध्ये ७२ लिटर सडवा मोवा माच किंमत ७,२००/- रू असा एकुण ७९००/- चा माल मिळून आला. तसेच डुक्कर धरा नाला आलेगाव येथे प्रो रेड केली असता आरोपी नामे मोतिखान कालेखान यांचे ताब्यात ०८ लीटर गावठी हातभटटीची दारू किंमत ८००/- रू तसेच ०५ टिन पत्राचे डब्यामध्ये ६० लिटर सडवा मोवा माच किंमत ६,०००/- रू असा एकुण ६,८००/- चा माल मिळुन आला. त्याचेवर पोलीस स्टेशन चान्नी येथे दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही मा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह साहेब, मा अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, मा उपविभागीय पोलीस अधिकारी गोकुळराज जी, शंकर शेळके ठाणेदार स्था. गु. शाखा, सपोनि विजय चव्हाण तसेच पोलीस स्टेशन येथील स्टाफ यांनी केली.
