रामायणाचार्य संजयजी महाराज पाचपोर यांच्याकडून घरपोच कुटुंबीयांना आर्थिक मदत

राहेर : पातुर तालुक्यातील राहेर येथील रहिवासी गजानन पाचपोर व ज्ञानेश्वर पाचपोर या दोघे भाऊ यांच्या घराला १ मार्च रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाले.

अक्षरशा अंगावरील कपड्या शिवाय काही शिल्लक राहिले नाही.मुलांची वह्या पुस्तके सुद्धा आगीत खाक झाल्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण सुद्धा धोक्यात आले आहे.या दोन्ही कुटुंबाला सर्वांच्या दुःखात सदैव व सहभागी होणारे रामायणाचार्य हभप. संजयजी महाराज पाचपोर यांच्याकडून रोख स्वरूपात आर्थिक मदत घरपोच देण्यात आली.घराला लागलेल्या आगीमध्ये धान्य,कपडे, भांडी जळून खाक झाले. सदर पैसेही आगीमध्ये जळून खाक झाले आहेत. गजानन पाचपोर यांना एक मुलगी व एक मुलगा आहेत दुसरा भाऊ ज्ञानेश्वर पाचपोर यांना एक मुलगा आहे.संकट कोसळलेल्या कुटुंबापर्यंत साधूचे मदतीचे हात तर पोचले परंतु शासनाची मदत कधी मिळणार व किती मिळेल ही आशा कुटुंबीयांना आहे. किमान प्रत्येकी पाच पाच लाख रुपये तरी नुकसान भरपाई शासनाकडून मिळावी अशी अपेक्षा सर्व राहेर ग्रामवासी करीत आहेत.तरी वरिष्ठांनी घडलेल्या घटनेची लवकरात लवकर दखल घेऊन शक्य तेवढ्या लवकरात आपली मदत पोहोचावी.