पातुर प्रतिनिधी
राष्ट्रीय स्तरावर उर्दू भाषेची ओळख जतन व संवर्धनासाठी मा.सर्वोच्च न्यायालयात पाठपुरावा करून विजय मिळविल्याबद्दल शाहबांबू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा माजी नगर अध्यक्ष मा.श्री सैय्यद बुऱ्हान यांचा भव्य सत्कार समारंभ संस्था उपाध्यक्ष श्री सै.सरफराजुद्दीन यांच्या अध्यक्षते खाली 1 मे महाराष्ट्र दिवस च्या निमित्ताने घेण्यात आला.

पातुर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर उर्दू भाषेत नाम फलक लिहिण्यात येऊ नये म्हणून मा.सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.मात्र श्री सय्यद बुरहान यांनी मोठ्या चिकाटीने अनेक संघर्षांना तोंड देऊन सतत पाठपुरावा करून सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक विजय मिळविला.मा सर्वोच्च न्यायालयाने सय्यद बुरहान यांच्या बाजूने निर्णय देतांना आपल्या 36 पृष्ठांच्या निर्णयात उर्दू विषयी भाष्य केले की “पातुर नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावरून उर्दू नाम फलक हटविता येणार नाही.मराठी भाषेसोबतच उर्दूमध्ये नाम फलक लिहिण्यावर कोणतीही बंदी नाही.उर्दूचा वापर हा केवळ संवाद अधिक मजबूत करण्यासाठी असून भाषेच्या विविधतेचा आदर राखायलाच हवा.भाषा ही नागरिकांमध्ये फूट पाडण्याचे कारण ठरता कामा नये.नगर परिषद हद्दीतील जर लोकांना उर्दू भाषा कळत असेल तर त्यावर कोणती आक्षेप घेण्याचे कारण नाही.उर्दू ही काही आपल्या देशाबाहेरील भाषा नाही मराठी हिंदी प्रमाणे ती इंडो आर्यन गटातील भाषा आहे उर्दू भाषेचा जन्म येथेच झालेला आहे

वेगवेगळ्या सांस्कृतिक बंध असलेल्या लोकांची ही संवाद भाषा आहे आजही देशातील सामान्य नागरिक जी भाषा बोलतात त्यात मोठ्या प्रमाणात उर्दू शब्द आहेत.भाषा म्हणजे धर्म नव्हे भाषा ही एखाद्या प्रदेशाची असू शकते धर्माची नाही.उर्दू ही भारतीय भाषा आहे तिचा कोणत्याही धर्माशी संबंध नाही” सैय्यद बुऱ्हान यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढा देणारे श्री कोथळकर,सय्यद मुजाहिद इक्बाल ऍड.अमजद अली खाँ,सै अहेफाजुद्दीन याच्या बदल्यात सै.वासीमोद्दीन मो फैज,एजाज मेम्बर,हमीदा बी,रेहाना बी शे.अश्फाक,मो गाजी उर रहेमान,ऍड सै.मोहसीन,ऍड.सै शाहिद इकबाल,रुपाली ताई सुरवाडे,श्री पोहरे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला या वेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री सैय्यद इसहाक राही सर यांनी सय्यद बुऱ्हान आणि त्यांच्या संपूर्ण चमूने रीतसरपणे मोठ्या संघर्षांना तोंड देऊन ऐतिहासिक विजय मिळविला यावेळी राही सरांनी या प्रकरणातील बारकावे सर्वांना समजून सांगितले. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत होत असून सय्यद बुरहान यांची सर्वत्र स्तुती होत आहे. यावेळी राही सरांनी सर्व भाषांचा आदर व मान राखण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून मुक्ती मोहम्मद अश्फाक, सरफराज नवाज खान, सय्यद अयाज, रहमान बाबू, शायर नूर अहमद नूर,मो.जाकीर प्रामुख्याने उपस्थित होते सर्व मान्यवरांनी सय्यद बुऱ्हान यांच्या उर्दू भाषेबद्दल कृतज्ञतेसाठी दिलेल्या लढ्या बद्दल स्तुति केली.
यावेळी प्राचार्य मुजीब उल्ला खान ,उप प्रा. अहेसान ऊर रहमान ,प्राथमिक मु. अ मो. असग़र,पर्यवेक्षक मोहसिन खान,शिक्षक विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन नासिर खान सर यांनी तर आभार प्रदर्शन प्राचार्य मुजीब उल्ला खान सर यांनी केले.