आलेगाव दी.५ प्रतिनिधी गेल्या शहरातील मोकाट कुत्र्यांना आलेगावा मध्ये आणू सोडल्याने सदर मोकाट कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये मुक्त संचार सुरू असल्याने ग्रामस्थ व विद्यार्थी हैराण झाले आहेत.आलेगावामध्ये काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा संचार वाढला असून सदर शेकडो कुत्रे रहदारीच्या रस्त्यावरून मुक्तपणे फिरत आहेत.त्यातील अनेक कुत्रे जखमी अवस्थेत असून,ती पिसाळ होण्याची शक्यता असल्याने,ग्रामस्थ व विद्यार्थ्यां मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर मोकाट कुत्रे हे शहरी भागातून पकडून आणून ग्रामीण भागामध्ये सोडल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.तसेच सदर कुत्रे हे गावातील अनेक रहदारीच्या रस्त्यावर मुक्तपणे फिरतांना आढलून येत असून अनेक जखमी कुत्रे हे बिनधास्त पणे घरामध्ये शिरत असल्याचे नागरिकांनी सांगितले असून कुत्र्यांना हाकलल्यास चवताळून अंगावर येत असल्याचे सांगितले.शहरी भागातून मोकाट कुत्रे ग्रामीण भागात सोडण्याची बाब सत्य असेल तर संबंधित प्रशासनाने वेळीच दखल घेऊन असला प्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी होत आहे.्
