पातुर प्रतिनिधी पातुर नगर परिषद च्या पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभारामुळे मुजावर पुरा परिसरातील नागरिक गेल्या 24 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असल्याने माजी नगराध्यक्ष हीदायतखा यांनी नगरपरिषद पाणी पुरवठा योजना ही पुन्हा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे परत करण्याची मागणी केली आहे. पातुर नगरपरिषद पाणीपुरवठा योजना पूर्ण कोलमोडली असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे . रमजान महिना चालू असताना मुस्लिम वस्ती असलेले मुजावरपूरा परिसरामध्ये पाईपलाईन दुरुस्तीच्या नावाखाली गेल्या 24 दिवसापासून पाणीपुरवठा करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांनी नगराध्यक्ष हिदायतखान यांच्यासह नगर परिषदेवर धडक दिली असता त्या ठिकाणी कोणती अधिकारी उपस्थित नव्हते. 2014 मध्ये 11 कोटी मंजूर करून पाणीपुरवठा योजना ही चालू करण्यात आली होती आणि या योजनाचा कालावधी 18 महीने पूर्णता करण्याचा होता . परंतु गेल्या दहा वर्षापासून ही योजना पूर्णतः सुरळीत झाली नाही या योजनेमध्ये मध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या पाणीपुरवठा विभागामध्ये अनेक स्थानिक राजकारणी लोकांचा सहभाग असून ते मोठ्या प्रमाणात आपले ओले हात करीत असल्याचा आरोप सुद्धा यावेळी करण्यात आला.