पातुर प्रतिनिधी- अकोला जिल्ह्यामध्ये नायलॉन मांजामुळे अनेक जण गंभीर जखमी झाली असून या नायलॉन मांजा बाबत वरिष्ठांकडून स्थानिक अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु या आदेशांना पातुर शहरात तीतांजली देण्यात आली.पातुर शहरात मकर संक्रांति निमित्त पतंग शौकिनांनी पतंग उडवण्याकरिता सर्रास नायलॉन मांजाचा खरेदी करून पतंग उडविण्याचा आनंद घेतला. पातूर शहरात नायलॉन मांजाची मोठ्या प्रमाणात विक्री झाली असून याकडे पातुर पोलिसांचे दुर्लक्ष होते. पोलिसांनी मुख्य बाजारपेठ मधील जनरल स्टोअर्समध्ये भेटी देऊन कारवाईचा फार्स कागदपत्रे पूर्ण केल्याची कळते. परंतु पातुर शहरांमधील दुकाना व्यतिरिक्त गल्लीबोळामध्ये ग्राहकांना ज्या ठिकाणी मांज्याची विक्री होते त्या ठिकाणी ग्राहकांना पोहोचविण्याची सुविधा करण्यात आली होती आज दुपारी पातुर बाळापूर महामार्गावरील सिदाजी दूध डेरी जवळ महामार्गाच्या मधात मांजा लोमकळत होता. हा मांजा अनेक वाहनधारकांच्या गळ्याला लागला परंतु सुदैवाने कोणी जखमी झाले नाही.
