अकोला जिल्ह्याचा गौरव
पातुर प्रतिनिधी…कोण बनेगा करोडपती या सामान्य ज्ञानावर आधारित बहुचर्चित टीव्ही मालिकेचा पंधरावा सीजन सुरू झाला आहे.यामध्ये अकोल्या जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील तांदळी खुर्द या छोट्याशा गावातील मूळ रहिवासी असलेली व हल्ली सुरत येथे वास्तव्यास असलेली सुमित्रा दिनेश कापडे हीची निवड दहा स्पर्धकांमध्ये झाली होती. त्यांना पुढील शूटिंगसाठी मुंबई येथे बोलवण्यात आले होते. त्यात पहिल्याच फेरीत हॉट सीटवर बसण्याचा बहूमान तिने मिळवला असून प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांना भेटण्याची संधी तिला मिळाली
सुरत येथे शोच्या टीमने त्यांच्या घरी जाऊन तीन दिवस त्यांच्या एकूणच जगण्याविषयीचे चित्रकिरण केले गेले. सूमित्राची निवड ही केवळ कापडे कुटुंबीयांसाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी तालुक्यासाठी आणि जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे अशी भावना सुमित्राने व्यक्त केली.

नऊ सप्टेंबर रोजी हा भाग सोनी टीव्हीवर प्रसारित झाला आहे. प्रत्यक्ष अमिताभ बच्चन यांच्याशी भेटून बोलून आणि हॉट सीटवर बसून आपल्याला फार आनंद झाल्याची भावना यावेळी सुमित्राने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
फोन अ फ्रेंड या लाईफ लाईन साठी तिने तुळसाबाई कावल उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे कार्यरत असलेले प्राध्यापक निलेश पाकदुने सर, लेखापरीक्षण विभागात वर्धा येथे कार्यरत असलेले विजययेंद्र वरोकार सर आणि शिकवणी वर्ग घेणारे ज्ञानेश्वर ठोंबरे सर यांची नावे यावेळी कौन बनेगा करोडपतीकडे दिली होती .आपल्या नावांची निवड केल्याबद्दल त्यांनी सुमित्राचे आभार मानले आहेत.
यावेळी विविध 12 प्रश्नांची उत्तरे देत 12 लाख 50 हजार रुपये व बोनस 1 लाख 60हजार रुपये रुपये असे एकूण 14 लाख 10 हजार रुपये जिंकून सुमित्राने खेळ सोडला. सुमित्राने मिळवलेल्या यशाबद्दल सुमित्राचे सासरे विष्णू कापडे ,सासू निर्मला कापडे,भासरे मारुती व विवेक कापडे, संपूर्ण कापडे परिवार व सर्व गावकरी मंडळी तसेच सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.