पातुर नगर परिषद च्या वतीने शहरांमध्ये स्वच्छता रावी याकरिता सकाळपासून स्वच्छता अभियान जनजागृती राबविण्यात येत आहे. पातुर शहरातील मुख्य रस्त्यावर केरकचरा टाकू नये. तसेच शहरातील चौका चौकामध्ये या अगोदर कचऱ्याचे ढीग होते याची विल्हेवाट लावण्याकरिता पातुर नगर परिषदेने पातुर शहराच्या सर्व मुख्य रस्त्यावर कचरा गाडी ही फिरवण्यात येत आहे या कचरा गाडीमध्ये आपल्या घरातील ओला व सुका कचरा टाकण्याचे आवाहन करण्यात आले होते पातुर नगर परिषद चे प्रभारी मुख्याधिकारी सय्यद ऐसानुद्दीन यांनी पातुर शहरांमध्ये स्वच्छता असावी. याकरिता आटोकाठ प्रयत्न सुरू केले आहे नागरिकांनी उघड्यावर कचरा टाकू नये असे आवाहन यावेळी करण्यात आली आहे.

काही नागरिक सकाळी अंधाराचा फायदा घेऊन उघड्यावर कचरा टाकण्याचा प्रयत्न करतात त्याला आळा घालण्याकरिता कर्मचारी नियुक्त करण्यात आला असून यावेळी उघड्यावर केर कचरा टाकणाऱ्या विरुद्ध जनजागृती अभियान चालू करण्यात आली आहे