प्रभुदास बोंबटकर (विशेष प्रतिनिधी )
पातूर :- जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळात जनसामान्यांपर्यंत तसेच शहरातील घराघरात पोहचविण्याचे कार्य करणारे राष्ट्रधर्माचे आजीवन प्रचारक स्व.श्री.रामरावजी परशराम माहूलीकर यांना पातूर शहरात श्री सिदाजी बाबा भजन मंडळ व गुरुदेव सेवा समिती अकोला यांचे वतीने सामूहिक प्रार्थनेचे माध्यमातून श्रद्धाजंली समर्पित करण्यात आली

गोष्ट १९४८ सालची एक चवथी पास मुलगा आपल्या आईवडिलांची परिस्थिती बघून शहरात काही काम मिळेल या उद्देशाने शहर गाठतो पणं काम मिळत नाही. पुढे रेल्वेने विनातिकिट प्रवास करून अमरावती गाठतो. स्टेशनवर एका हॉटेलात काम दोन वेळ जेवणाची व राहण्याची सोय करून पंधरा दिवस काढतो. कामं करताना अचानक ‘श्री गुरूदेव’ हे मासिक त्याच्या दृष्टीस पडते मासिकातिल बालसंस्कार शिबिराची माहिती वाचून मुलगा सरळ पायी चालत अमरावती ते मोझरी गुरुकुंज आश्रम गाठतो . शिबिरस्थळी पोहोचल्यावर शाळा सोडल्याचा दाखला व आईवडिलांची परवानगी नसल्यामुळे त्याला प्रवेश नाकारण्यात येतो. परंतु ईच्छा तेथे मार्ग उद्या युक्तीप्रमाणे राष्ट्रसंतांना भेटूल हा मुलगा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रमातील बालसंस्कार शिबिरात प्रवेश मिळवतो आणि खऱ्या अर्थाने येथून या मुलाच्या आयुष्याला कलाटणी मिळते .

बालवयातच शिबिरात सकाळी ध्यान, व्यायाम, संध्याकाळी प्रार्थना, रात्री भजन असे अनेक संस्कार त्या बालमनावर बिंबतात.आणी ह्याच संस्कारांची शिदोरी घेऊन तो बालक आपल्या गावी परततो.गावी परततांना महाराजांकडून वचन घेतो की एकदा तरी माझ्या पातूर गावी यावे,सात-आठ वर्ष निघून जातात.आणी अचानक १९५६ साली पातूर मध्ये महाराज आले असता त्यांच्या नजर समोरून भगवी टोपी घातलेला मुलगा दिसतो महाराज ड्राइव्हर ला सांगून मुलास बोलावतात मुलगा बघतो तर काय समोर दस्तुरखुदृद तुकडोजी महाराज गाडीत बसलेले असतात. महाराज बालकास ओळखतात आणी प्रेमाने विचारपूस करतातं हेच का तुझे गाव….पुढे मुलगा महाराजांना घरी येण्यासाठी हट्ट धरतो पणं महाराजांना पुढील कार्यक्रमासाठी नाम जायचे असते परंतु दिलेले वचन पाळायचे असल्यामुळे महाराज होकार देत त्याच्या मागे त्याच्या घरी जायाला पायी निघतात.
अठराविश्व दारिद्र असलेल्या घरात महाराजांची श्यक्य होईल तशी मनोभावे व्यवस्था केली जाते.मुलगा आपल्या गावातील लोकांना सुध्दा दर्शनाचा लाभ मिळावा असं मागणं मागतो.राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित सर्वांच्या मदतीने आठवडी बाजारात महाराजांचे प्रवचन आयोजिले जाते स्टेज तसेच ध्वनीप्रक्षेपची व्यवस्था केली जाते.गावात दवंडी देण्यात येते. हजारोंच्या संख्येने लोकं मुंग्यांसारखे गोळा होतात. काही मिनिटांसाठीच आयोजित केलेला कार्यक्रम पुढे पाऊने दोन तास रंगतो आणी कुणालाच कळतही नाही. आणी अश्याप्रकारे ह्या बालकामुळे संपूर्ण गावक-यांना महाराजांच्या साक्षात दर्शनाचा व प्रवचनाचा लाभ मिळतो तो बालक म्हणजेच….. श्री रामराव दादा माहुलीकर (रामराव मिस्तरी)त्यांनी बालवयातच खंजिरी हाती घेवून भजनाच्या माध्यमातून गावकर्यांना मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण,भजन सेवा देण्याचे कार्य आयुष्यभर त्यांनी केले. आज रोजी रामराव मिस्तरी अनंतात विलीन झाले.परंतु त्यांच्या कार्याच्या रूपाने ते सदैव आपल्यात असतील

आज दि.२ फेब्रुवारी त्यांचा जन्मदिन त्या निमित्ताने माहुलीकर परिवार व श्री सिदाजी बाबा भजन मंडळ यांचे वतीने रामरावजी माहुलीकर त्यांची जयंती व पुण्यतिथी एकाच कार्यक्रमातुन श्रद्धांजली अर्पण करून साजरी करण्यात आली.आणी उपस्थितांना असा दुर्मिळ श्रदांजलीचा योग अनुभवायास मिळाला.मान्यवरांनी आपल्या श्रद्धांजली अर्पण करतांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेला,राष्ट्रधर्माला केंद्रभूत ठेवून ग्रामगितेतील विचार मुलांमध्ये रूजविण्यासाठी प्रामाणिक करावे व सत्वशील समाजाच्या निर्मितीसाठी आपले कार्य अखंड सुरू ठेवावे हीच रामराजी माहुलीकर यांना खरी श्रद्धांजलीसेल असें विचार मांडले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री रामराव दादांनी लिहिलेल्या लेखाचे पुस्तकं प्रकाशित व्हावे अशी ईच्छा प्रगट केली असता पुढील पुण्यतिथला त्यांच्या लेखाच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची ईच्छा पत्रकार श्री प्रदीप काळपांडे यांनी व्यक्त केली व या कार्यास सर्वांनी मदत करावी असें आवाहन केले.यावेळी समस्त माहुलीकर परिवार,बाळापूर तालुक्याचे ग्रामगीता प्रचारक, गुरुदेव सेवा समिती अकोला तथा श्री.सिदाजी भजन मंडळाचे विलास राऊत,रमेश काळपांडे, श्री गिऱ्हे साहेब,संजय राऊत,श्री ठाकरे साहेब,श्री माऊली भक्त परिवार सदस्य प्रज्वल भाजीपाले आई तुळजा भवानी संस्थांनचे सदस्य प्रभुदास बोंबटकर, सचिन इंगळे विठ्ठल काळपांडे पत्रकारश्री.प्रदीप काळपांडे यांचे समवेत असंख्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराज भक्त बंधू भगिनी उपस्थित होते