पातुर आकाश राऊत यांच्याकडून
बाळापूर मतदारसंघात सततच्या अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानी संदर्भात तातडीची बैठक आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख मा नितीनजी देशमुख यांनी बोलावली होती या बैठकीला मा उपविभागीय अधिकारी बाळापूर,मा तहसीलदार बाळापूर,पातूर

मा ता कृषी अधिकारी बाळापूर,पातूर मा गटविकास अधिकारी बाळापूर,पातूर

सर्वश्री मंडळ अधिकारी उपस्थित होते यावेळी सततच्या पावसाने शेतकऱयांचे १००%टक्के नुकसान झाले असून बांधावर जाऊन त्यांच्या समक्ष त्यांच्या सहीने पीक नुकसानीचे अहवाल 5 पाच दिवसात सादर करण्याचे निर्देश मा आमदार नितीनजी देशमुख यांनी दिलेत त्यामध्ये प्रामुख्याने कापूस,

तूर,हरभरा,गहू,फळे,भाजीपाला,निंब आदींचा समावेश करीत तलाठ्यांनी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले