पासून पोलीस स्टेशन येथे आज 19 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम जन्मभूमी येथे प्राण प्रतिष्ठा व महाराष्ट्र मधील जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी पातुर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये असणारा कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता आज ठाणेदार किशोर शेळके यांनी शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सोशल मीडियावर चुकीची पोस्ट व्हायरल करू नका असे आवाहन ठाणेदार किशोर शेळके यांनी केली पातुर शहरात व परिसरामध्ये 22 तारखेला श्रीराम प्राणप्रतिष्ठा हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीला पत्रकार प्रदीप काळपांडे ज्येष्ठ समाजसेवक विजयसिंह गहलोत, माजी नगराध्यक्ष हिदायत खान, पत्रकार देवानंद गहीले, मनोहर खंडारे, बाली खंडारे यांनी आपले विचार मांडले या बैठकीला पातुर शहरातील पत्रकार प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. परंतु या बैठकीमध्ये शहरातील काही पत्रकारांना व समाजसेवकांना निमंत्रण न दिल्यामुळे थोडा नाराजीचा सूर उमटत आहे
