आलेगाव येथील गोसेवा एवम अनुसंधान प्रकल्प च्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदृढ गोवंश पुरस्कार तसेच गो सेवेसाठी निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला गाय ही आपली माता आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या माऊलीची म्हणजेच आईची सेवा करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या गोमातेची सेवा आणि तिचे संरक्षण करायला पाहिजे हे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपणास शिकायला मिळते त्याच परंपरेला त्या संस्कृतीला पुढे नेण्याकरिता आणि येणाऱ्या पिढीला त्याकरिता प्रेरणा मिळण्यासाठी दरवर्षी संस्था गोप्रेमी तसेच गो वंश पुरस्कार जाहीर करते. दुग्ध शर्करा योग म्हणजेच या कार्यक्रमाचे औचित्य साधून अकोला येथील समाजसेवीका सौ. पायल पियुष जी सांगवी यांनी गोरगरीब आणि गरजूंना ब्लॅंकेट चे वाटप केले. कार्यक्रमां चे अध्यक्ष बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे सदस्य तसेच मा अध्यक्ष एडवोकेट मोती सिंग मोहता तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून भाऊराव कुदळे माजी आमदार बळीरामजी सिरस्कार किशोर मांगटे पाटील अनुप जी संजय धोत्रे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गो पूजन तसेच विद्येची आराध्य दैवत सरस्वती मातेच्या पूजनाने झाली त्यानंतर गोरगरीब जनतेला ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले आणि कार्यक्रमाचा मुख्य भाग म्हणजे सुदृढ गोवंश पुरस्कार उत्कृष्ट गोवन संगोपन पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि आणि पुरस्कार प्राप्त गोसेवकांचे सत्कार करण्यात आले त्यासोबतच आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये गो रक्षण तसेच गाव संगोपन करिता निस्वार्थ भावनेने सेवा करणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा सत्कार करण्यात आला ज्यामुळे येणाऱ्या पिढीला आपल्या परंपरेत बद्दल आणि संस्कृती बद्दल आदर निर्माण हो आणि त्यांनाही गोसेवेकरिता प्रेरणा मिळेल उपस्थित मान्यवरांनी आलेल्या सेवाभावी गोरक्षकांनी मार्गदर्शन केले तसेच आपली संस्कृती कशी जपता येईल याबद्दल आपले विचार सर्वांसमोर मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण खरे यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नूतन विद्यालय आलेगाव प्रभा प्रकाश कॉन्व्हेंट आलेगाव तसेच रसिकलालजी धारिवाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था च्या सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
