पातुर प्रतिनिधी…
दिनांक ७ एप्रिल रोजी साप्ताहिक कवायचे दरम्यान सेवानिवृत्त सुरेश नेमाडे व पत्रकार सतीश सरोदे यांचा अभिनंदन व सत्कार सोहळा संपन्न
होमगार्ड तालुका पातुर पथक ची पोलीस स्टेशन येथे साप्ताहिक कवायत घेण्यात येते. साप्ताहिक कवायत चे दरम्यान अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ संलग्न मुंबई शाखा पातुर चे नवनिर्वाचित पातुर तालुका अध्यक्ष सतीश भाऊ सरोदे यांचे होमगार्ड संघटनेच्या वतीने शाल श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच नुकतेच सेवानिवृत्त झालेले पातुर पथकातील होमगार्ड सैनिक गणपत सुरेश नेमाडे सनद नंबर १०३४ हे वयाच्या ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झाले यांचा पातुर पो स्टे चे ठाणेदार किशोरजी शेळके व केंद्र नायक मा.राजेंद्र शेळके यांच्या हस्ते शाल श्रीफळ,पुष्प गुच्छ देऊन सेवानिवृत्त सत्कार करण्यात आला.

मंचावर उपस्थित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार किशोर शेळके,ज्येष्ठ पत्रकार प्रदीप काळपांडे,सत्कारमूर्ती पत्रकार तथा तालुका अध्यक्ष सतीश भाऊ सरोदे. सेवानिवृत्त सत्कार मूर्ती सुरेश नेमाडे,अकोला पथकाचे पलटण नायक दीपक सूर्यवंशी, पलटण नायक प्रेम कुमार दामोदर,पलटण नायक अशोक इंगळे पातुर तालुका समादेशक संगीता इंगळे सह सार्जंट राजेंद्र निमकंडे, सेक्शन लिडर शाम शेगोकार सह पातुर पथकातील महिला पुरुष होमगार्ड या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रास्ताविक व आभार प्रदर्शन पातुर तालुका समादेशक संगीता इंगळे यांनी केले.