उद्या 26 एप्रिल रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना चे नेते मा खासदार संजय राऊत यांनी अकोला मतदारसंघातील नागरिकांना काँग्रेसचे उमेदवार अभय दादा पाटील यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.

अकोल्या मतदारसंघात महाविकास आघाडी ची घटक शिवसेना पक्षाचे आमदार तथा जिल्हाप्रमुख आमदार नितीनजी देशमुख यांनी या निवडणुकीत कंबर कसली असून त्यांनी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान संपूर्ण अकोला मतदारसंघ पिंजून काढला त्यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी पूर्ण जिल्ह्याभर कडक तापमानात प्रचार करीत होते आघाडीचा उमेदवार विजयी व्हावा याकरिता शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेतल्याचे चित्र दिसून येत आहे. आपल्या प्रचारादरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी बाळापुर मतदारसंघात 30 ते 40 हजाराचा लीड घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार अभी दादा पाटील हे विजयी होतील अशी खात्री बोलताना दिली.

अकोला जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू-भगिनी आपला मतदानाचा हक्क पार पाडावा अशी आवाहन यावेळी आमदार देशमुख यांनी केले सर्व आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी गावांमधील मतदारांचे मतदान करण्याची आवाहन करण्यात आले