- हजारो विद्यार्थ्यांना मिळणार अंतराळ यानाचा प्रवास अनुभव
- इस्रो व विज्ञान भारतीचा प्रेरणादायी उपक्रम
पातूर : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पातुर येथे बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी इस्रो, विज्ञान भारती विदर्भ प्रदेश मंडळ नागपूर, शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्पेस ऑन व्हील या उपक्रमांतर्गत अंतराळ प्रवासाची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
इस्त्रोचे विज्ञान व तंत्रज्ञान असलेली फिरती बस विज्ञानाचा प्रचार व प्रसार प्रदर्शन द्वारे करण्यासाठी सदर बस पातुर तालुक्यात दिनांक 03 जानेवारी 2024 ला प्रदर्शनाकरिता उपलब्ध राहणार आहे.आपल्यापासुन अंतराळ लक्षावधी किलो मीटर अंतरावर असुनही जमिनीवरुन दिसणारे चंद्र सुर्य, ग्रह, असंख्य तारे आणि एकूणच अंतराळाचे कुतूहल कायम राहिले आहे. अंतराळ प्रवासाची परिपूर्ण माहिती सर्व सामान्य नागरीकांसह विद्यार्थ्यांना व्हावी ह्या एकमेव उद्देशाने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISRO ने SPACE ON WHEELS ही अनोखी फिरती बस तयार केली आहे. सदर बसमध्ये चंद्रयान मोहिम, मंगळयान मोहिम, अवकाशात सोडलेले विविध उपग्रह तसेच इस्त्रोचा आता पर्यंतचा अंतराळ प्रवास विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व समस्त पातुर तालुक्यातील नागरिकांना पहायला मिळणार आहे. यामध्ये विज्ञान भारती अंतर्गत विविध स्पर्धा, व्याख्याने, अंतराळ सफर, फिल्म इत्यादी बसमध्ये आकर्षण राहणार आहे.
इस्त्रोची बस शाळेमध्ये सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:00 वाजेपर्यंत प्रदर्शनासाठी उपलब्ध राहील.
पातुर तालुक्यातील सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सदर प्रदर्शनी दाखवण्यासाठी विभा अँप वरून ऑनलाईन नोंदणी करून आयोजक शाळेला कळवावे व तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रदर्शनीचा लाभ देण्यासाठी नियोजन करावे, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती पातुर, मुख्याध्यापक सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर, पातुर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांनी केले.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा