डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत श्रीमती. सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय, शिरला अंधारे येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत खामखेड येथील शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया कशी करावी व त्याची योग्य पद्धत व त्याचे फायदे सांगितले. बीयानांची बीज प्रक्रिया करने खूप महत्त्वाचे असते पिकांवर येणारे रोग जे जमीनी च्या माध्यमातून बीयांवर येतात अश्या रोगांपासून तसेच किडीपासुन पिकांचे संरक्षण करणे. बीज प्रक्रियेमुळे पिकाची निरोगी वाढ होते. आपण आपल्या पिकाचे कसे संरक्षण करू शकतो याची योग्य पद्धत सांगितली. यावेळी शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना चांगलाच प्रतिसाद दिला. त्यांना उत्पन्न होणारे सर्व प्रश्न विचारले. व सहकार्य केले. यावेळी रामेश्वर ठाकरे, अनिल ठाकरे, आदित्य गालट, अभिजित खंडारे व इतर शेतकरी उपस्थित होते. याकरिता कृषी दूत उदय घनबहादुर, एकांत गोंदोळे, संकेत कदम, साहिल नन्नावरे यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खर्डे सर कार्यक्रम अधिकारी प्रा. शिवकुमार राठोड सर कार्यक्रम समन्वयक प्रा.श्रद्धा चव्हाण मॅडम व विषय तज्ञ प्रा. सागर भगत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
