पातूर (प्रतिनिधी):-सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने राष्ट्रीय हरित सेना अंतर्गत ‘चला जणुया वनाला’ या उपक्रमार्तंगत दि.8 ऑगस्ट 2024 रोजी वसंतराव नाईक विद्यालय पातुर येथील विद्यार्थ्यांसाठी काटेपुर्णा अभयारण्यात निसर्ग अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. ही निसर्ग अभ्यास सहल निसर्गकट्टाच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. निसर्ग कट्टा ने सर्व प्रथम शाळेत काटेपुर्णा अभयारण्यावर स्लाईड शो दाखवून त्याच्या आधारे एक लेखी परीक्षा घेतली व त्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना या सहली मध्ये समावेश करण्यात आला होता.
सर्वप्रथम काटेपुर्णा अभयारण्यातील निसर्ग माहिती केंद्रात तिथे आढळणाऱ्या जैवविविधतेची माहिती करून देण्यात आली, निसर्ग पायवाटेवर भम्रंती करून जंगलाचे महत्व, वन्यजीव विभागाचे कार्य, जैवविविधतेची महिती देण्यात आली.सहलीच्या शेवटचा टप्पात निवडक मुलांनी उपस्थित मान्यवरांच्या समोर सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते मुलांना प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.निसर्गकट्टाचे श्री. अमोल सावंत,काटेपुर्णा अभयारण्यातील पर्यटक मार्गदर्शक श्री. नागसेन आकोडे यांनी निसर्ग अभ्यास सहलीत मोलाचे मार्गदर्शन केले. या सहलीच्या आयोजन वसंतराव नाईक विद्यालयाचे प्राचार्य श्री एस.एम सौंदळे सर व सामाजिक वनीकरण विभाग, पातूर वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. ओवे यांच्या मार्गदर्शन या सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना अभयारण्य विषयी उत्कृष्ट माहिती दिल्याबद्दल सर्व वनाधिकाऱ्यांचे श्री चंद्रकांत वाघ यांनी आभार मानले. या सहली करीता वसंतराव नाईक विद्यालयातून श्री गणेश राऊत सर, श्री चंद्रकांत वाघ सर, व सौ किरण लोखंडे मॅडम तसेच विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सहल यशस्वी करण्यासाठी पण वन विभागाचे पवन जाधव, आर एफ ओवे सर ,प्रवीण कांबळे आर एफ ओ सर,आदरणीय श्री सावंत सर,सरकटे वनरक्षक,लोखंडे वन व वनपरिक्षेत्र कार्यालय पातूर येथील वनपाल कु.एस.धोत्रे पवनरक्षक श्री.संजय लोखंडे यांनी परिश्रम घेतले
