शाळेच्या मुख्याध्यापिका कुमारी व्ही.एम सरप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये महिला पालकांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शहरातील 1000 महिलांनी प्रतिसाद दिला. या कार्यक्रमांमध्ये महिलांना ओला कचरा व सुका कचरा याची कशाप्रकारे विल्हेवाट लावावी याची माहिती सांगितली. तसेच किशोरवयीन मुलींच्या समस्या व उपाय याची माहिती महिला पालकांना सांगितली, यानंतर सर्व महिलांना सौभाग्याचे वान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला सौ. पुष्पाताई देशमुख मॅडम,सौ. लखाडे मॅडम सौ. पोहरे ताई, कुमारी धोटकर मॅडम कुमारी शितल मॅडम,कुमारी सौ दिपाली वानखडे मॅडम. सौ.पोहरे ताई सौ तिडके ताई यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला
