पातूर दि -06/12/24
धनेश्वरी मानव विकास मंडळ द्वारा संचालित ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात डॉ. मनिष खंडारे व धनंजय मिश्रा यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन विषयक कार्याची माहिती दिली. कार्यक्रमा निमित्त संचालक डॉ.साजिद सर, प्राचार्य जयश्री काटोल, उप प्राचार्य डॉ.अभय भुस्कडे,डॉ. शैलेश पुंड,डॉ.मनिष खंडारे, धनंजय भाऊ मिश्रा प्रा.प्रशांत निकम व महाविद्यालयीन कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यकमाचे सूत्रसंचालन व सुनियोजित कार्यक्रम नियोजन प्रथम वर्ष विद्यार्थ्यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.