भाजपा महिला आघाडीच्या वतीने माता व पालकांना मार्गदर्शन

(प्रतिनिधी पातुर) संगीता इंगळे :-
बाळापुर तालुक्यातील ग्रामीन भागातील एका खेडे गावातील एका शिक्षकाने शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनी सोबत अश्लील वर्तन करून गुरू-शिष्य या पवित्र परंपरेला काळीमा फासण्याचा प्रकार केल्याने माता पिता,पालक वर्गामध्ये मुलींना शाळेत पाठविण्याविषयी भितीचे वातावरण निर्माण झाले असून.या माता पालकांच्या मनात असलेली भीती काढण्यासोबत गुन्हेगार शिक्षकाला कडक शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री यांच्याशी संपर्क करणार असल्याचे केंद्रीय माजी खासदार संजयभाऊ धोत्रे यांच्या पत्नी व विद्यमान खासदार अनुपदादा धोत्रे यांच्या आई व आमच्या सौ.सुहासिनीताई धोत्रे त्यांच्यासोबत भाजपा महिला पदाधिकारी माजी आमदार बळीराम शिरस्कार यांच्या पत्नी रेणुकाताई सिरस्कार अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हाध्यक्ष सौ.वैशालीताई निकम,अकोला महानगर अध्यक्ष सौ.चंदाताई शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष ज्योतीताई ताले,अकोला जिल्हा ग्रामीण जिल्हा चिटणीस सौ.छायाताई मानकर,बाळापुर तालुका अध्यक्ष सौ.अर्चनाताई मसने,सौ.जयश्रीताई पटोकार बाळापुर तालुका अध्यक्ष अंबादास घेंगे,दिलीप पटोकार,योगेश भाऊ पटोकार श्रीकृष्ण मोरखडे,नकुल वाकडे,आकाश वाकडे,सुभाष धुमाळे,विष्णू धुमाळे,गजानन कराळे,शंकर सगणे,अनंता माळी,दिनेश तायडे सर्व भाजपा पदाधिकारी यांच्या उपस्थित माता व पालकांना आश्वासन देण्यासोबत धीर देण्याचे काम केले.त्या आज ता बाळापुर येथील जि.प.शाळेत मार्गदर्शन करताना बोलत होत्या! गावातील महिलांना त्यांनी त्यांचा वैयक्तिक मोबाईल क्रमांक देऊन जेव्हा अडीअडचणी येतील तेव्हा थेट संपर्क करण्याबाबत सुचविले व, सदैव भा ज पार्टी आपल्या पाठीशी राहू तुमच्या अडीअडचणी सुखदुःखे ही माझी आहेत.कारण मी देखील एक महिला आहे.
असे पीडित कुटुंबीयांना आश्वस्थ केले.गावकरी बंधू आणि भगिनी यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.