सर्पमित्रांनी नागाला पकडून जीवदान दिले
पातूर : चक्क पोलीस स्टेशनमध्ये विषारी नाग घुसल्याचा प्रकार घडला.सुदैवाने नेमक्या त्याचवेळी सर्पमित्र पोलीस स्टेशनमध्ये हजर असल्यामुळे उपस्थित कर्मचारी व सापाला देखील भयमुक्त करण्यात आले.
आज दि.10 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पातूर पोलीस स्टेशनमधील मालखान्यात सफसफाईचे काम सुरू असताना एका पृष्ठाच्या बॉक्समध्ये साप बसून असल्याचे पोलीस कर्मचाऱ्यांना दिसले.त्यामुळे सफसफाईचे काम थांबले असता नेमक्या त्याचवेळी पातूर शहरातील पत्रकार तथा सर्पमित्र स्वप्निल सुरवाडे व सर्पमित्र संजय बंड हे हजर असल्याने पोलिसांनी त्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. दरम्यान दोन्ही सर्पमित्रांनी शोध घेतल्यावर कोब्रा जातीचा विषारी साप असल्याचे समजताच सर्पमित्रांनी सापाला सुरक्षित रित्या पकडून आपल्या नैसर्गिक आवासात सुखरूप सोडून दिले.
यावेळी सर्पमित्रांनी उपस्थितांना सापाबद्दल माहिती देऊन सापाला नं मारता जवळच्या सर्पमित्रांना बोलावून साप वाचविण्यासाठी मदत करावी असे आवाहन केले.