पातुर नगरपरिषद चे माजी उपाध्यक्ष सय्यद अहफाजोद्दीन उर्फ गोरे बाबू यांचे रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले या घटनेमुळे पातूर शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सय्यद अहोफाजुद्दीन हे पातुर शहरांमध्ये गोरेबाबू या नावाने परिचित होते. त्यांनी सतत दहा वर्ष नगरपरिषद मध्ये नगरसेवक म्हणून काम केलं त्यांनी बांधकाम सभापती ,,आरोग्य सभापती नगर परिषद उपाध्यक्ष हे पद भूषवले होते सर्वांना संकटात सुखदुःखात साथ देणारे असे परिचित नगरसेवक म्हणून ओळखला जात होते त्यांनी नगरसेवक असताना त्यांच्या प्रभागात स्वच्छतेवर जास्तीत जास्त भार दिला होता त्यांचे या दुःखद निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी रोखठोक न्यूज चॅनलच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
