पातुर प्रतिनिधी पातूर येथील पत्रकार सतीश सरोदे यांचा नवनिर्वाचित पातुर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद अकोला जिल्ह्याच्या वतीने युवा खासदार श्री अनुप धोत्रे यांनी मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला पातुर येथील दैनिक तरुण भारत चे युवा पत्रकार सतीश सरोदे यांची अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या पातुर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांचा अकोला येथील जिल्हा पत्रकार संघाच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा भरतील सर्व पत्रकार मंडळी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार अनुप दादा धोत्रे, विधान परिषद सदस्य वसंत जी खंडेलवाल, माजी राज्यमंत्री अझहर हुसेन,मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ जी शर्मा, अकोला जिल्हा अध्यक्ष शौकत अली मिर साहेब ,सरचिटणीस प्रमोद लाजूरकर सह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते .या कार्यक्रमादरम्यान यावेळी सतीश सरोदे यांची पातुर तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याने मराठी पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य प्रदीप काळपांडे, उमेश देशमुख, उपाध्यक्ष किरण कुमार निमकंडे, साजिद सर, मोहम्मद जफर, नाशिर भाई, संगीता इंगळे, प्रमोद कढोणे, श्रीकृष्ण शिगोकार, निखिल इंगळे, पंजाब इंगळे ,राहुल देशमुख, श्रीकृष्ण लखाडे, योगेश नागोळकर, शोएब भाई, सुमित भालतिलक जफर भाई,अमोल देवकते यांनी शुभेच्छा दिल्या.
