पातुर (प्रतिनिधी)- नुकतेच शासकीय महाराष्ट्र राज्य एलिमेंटरी तसेच इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या दोन्ही परीक्षांमध्ये वसंतराव नाईक विद्यालय पातुर चा शंभर टक्के निकाल लागला आहे. वसंतराव नाईक विद्यालय पातूर मधून शासकीय महाराष्ट्र राज्य एलिमेंटरी ग्रेड परीक्षा तसेच इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेमध्ये एकूण व 33 विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते, यामधून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत ‘अ’ श्रेणीमध्ये 01′ ब’ श्रेणी मध्ये 04 तर ‘ ‘क ‘ श्रेणीमध्ये 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तसेच इंटरमिजिएट परीक्षेमध्ये ‘ब’ श्रेणीमध्ये 03 तर ‘क’ श्रेणीमध्ये 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांना विद्यालयातील कलाशिक्षक चंद्रकांत वाघ यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक/ सचिव मा.श्री रामसिंगजी जाधव साहेब व प्राचार्य एस.एम.सौंदळे यांनी कौतुक केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या
