अकोला जिल्ह्यातील पातुर पंचायत समितीमध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचार उघड झाले असून पदाधिकाऱ्यांचे व अधिकाऱ्यांचे धिंडवडे निघत आहेत. या पंचयात समितीमध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून सिंचन व्हेरी मंजूर करण्याकरिता दलालाकडून 25 ते 30 हजार रुपये घेण्यात येत आहेत याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत परंतु या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात आली आहे. अनेक प्रकरणांमध्ये जिल्हा परिषदेत त्यांच्याकडून चौकशीचे आदेश झाले हे सर्व आदेश स्थानिक पदाधिकारीच्या दबावामुळे गेल्या सहा महिन्यापासून दाबून ठेवण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पातुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध योजना ह्या कागदपत्रे दाखवून त्यांच्यामध्ये लाखो रुपयाचा अपहार केल्याच्या तक्रारी आहेत परंतु या तक्रारीचा योग्य चौकशी न केल्यामुळे तक्रारदारांना अनेक वेळा अकोला, पातुर कार्यालयामध्ये हेलपाटे घ्यावे लागत आहेत अनेक प्रकरणांमध्ये विविध गावाचे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उपोषण केले उपोषणाच्या वेळी आश्वासन देऊन उपोषण सोडण्याचा प्रयत्न अधिकारी यांनी केला परंतु पातुर तालुक्याच्या पंचायत समितीचा कारभाराचा विभागीय कार्यालयाकडून योग्य चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर निघण्याची शक्यता आहे सध्या पातुर तालुक्यात अनेक प्रकरण गाजत असून या प्रकरणात कारवाई करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पातुर गट विकास अधिकारी यांना दिले असता गटविकास अधिकारी गजानन अगर्ते यांनी सुट्टीचा अर्ज टाकून निघून गेले आहे त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई कोण करणार हे कोड पडले आहे
