बस स्टॅन्ड ते वाशिम बायपास दरम्यान चोरी की गहाळ?
सिव्हिल लाईन पोलीस व एलसीबी घेत आहे शोध
अकोला मुख्य बस स्थानकातून औरंगाबाद बस मध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवासाच्या बागेतील 35 लाख रुपये किमतीचे सोने व तीन लाख रुपये नगदी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे खळबळ उडाली या प्रकरणी पोलीस तक्रार करण्यात आली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

अकोल्यातील गणेश नगर परिसरातील सचिन गंगाळे बहिणीकडे लग्न सोहळा निमित्त जाण्यासाठी गणेश नगर वरून अकोला बस स्टॅन्ड आले या दरम्यान संभाजीनगर च्या बस मध्ये बसल्यानंतर वाशिम बायपास जवळ त्यांना बॅग मधील ३५ लाख रुपये किमतीचे सोने व ३ लाख रुपयांची रोख रक्कम गायब झाल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला यावेळी वाशिम बायपास परिसरात बसमधील चार प्रवासी खाली उतरले होते. घटनेची गंभीरता लक्षात घेता बस पुन्हा अकोला बस स्थानकावर आणण्यात आली त्यानंतर चोरीच्या घटनेची तक्रार सिविल लाईन पोलीस स्टेशनला देण्यात आली

या चोरीच्या घटनेनंतर सिव्हिल लाईन पोलीस सोबतच स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पथक व इतर सर्व पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना अलर्ट करण्यात आले असून त्या चोरट्यांचा शोध घेणे सुरू आहे. तक्रारदारला सोबत घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने बस स्थानक ते वाशिम बायपास पर्यंत सर्च ऑपरेशन राबविले. पोलिसांद्वारे वाशिम बायपास परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात येत आहे चोरीच्या या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली असून घटनेबाबत तक्रार कर्ता याने माहिती दिली