पातुर प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य कोषाध्यक्षपदी प्राध्यापक संजय लेनगुरे यांची निवड महासंघाचे राज्य अध्यक्ष प्राध्यापक सुनील डिसले बारामती (पुणे )राज्य सचिव प्राध्यापक बाळासाहेब माने मुंबई यांनी राज्य कार्यकारीणी सभेत जाहीर केली.प्रा. संजय लेनगुरे हे भंडारा जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते.गेल्या पाच वर्षात मराठी विषय शिक्षकांना संघटित करून अध्यापनात येणाऱ्या अडचणीवर तसेच विविध विषयांवर तोडगा काढण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची राज्य कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते विज्युक्टा भंडाराचे जिल्हा कार्याध्यक्ष, म्हणून काम पाहतात.
कोरोना काळापासून तर आजतागायत सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन तासिका घेणे, जिल्हास्तरावर विविध स्पर्धा उपक्रम राबविणे, प्रा. लेनगुरे सर यांची एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून ख्याती आहे. ते शिक्षक संघटनामध्ये सक्रिय असून शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी तत्परतेने धावून जातात.
मराठी भाषा विषयाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी, भाषाविषयक उपक्रमांचे संवर्धन करणे,जिल्हास्तरावर विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविणे, तसेच कनिष्ठ माध्यमिक स्तरावर मराठी भाषा विषय सक्तीचा व्हावा म्हणून सदैव कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. या त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे…!