पातूर :- 26 नोव्हेंबर संविधान दिन म्हणून पातूर येथील मातोश्री बुद्ध विहार मिलिंद नगर येथे साजरा करण्यात आला या वेळी साने गुरुजी प्रसारक मंडळ यांच्या वतीने संविधान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कर्यक्रमासाठी पातूर पोलीस स्टेशन चे सहाययक पोलीस निरीक्षक मेश्राम हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते तर मिलिंद नगर येथील रुस्तम गवई ,बळीराम खंडारे ,प्रमोद खंडारे ,गणेश इंगळे व विशाल राखोंडे या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या वेळी ऋषभ कपिल पोहरे या चिमुकल्याने संविधान वर अप्रतिम भाषण दिले तसेच प्रिया अमोल बागडे या चिमुकलेने सुद्धा या वेळी भाषण दिले असून या चिमुकल्याचा भारतीय संविधान प्रत देऊन मेश्राम यांच्या वतीने गन गौरव करण्यात आला या कार्यक्रमा वेळी सार्वजनिक रित्या संविधानाचे पठण करण्यात आले या वेळी मिलिंद नगर येथील युवक,युवती जेष्ठ नागरिक व महिला बौद्ध उपासक तथा उपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते
