पातुर प्रतिनिधी :-(संगीता इंगळे)
पातुर पोलिसांचे शहरातील मुख्य मार्गाने पथसंचलन करण्यात आले.आगामी सण उत्सवाच्या निमित्ताने
पोस्ट पातूर येथे 16 सप्टेंबर रोजी आगामी सण उत्सव श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने पातुर शहरामध्ये सहाय्यक पोलीस अधीक्षक सा.उपविभाग बाळापुर गोकुळराज यांचे मार्गदर्शनाखाली,

पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, यांच्या उपस्थितीत रूट मार्च घेण्यात आला. यावेळी उपनिरीक्षक गजानन तडसे,बंडू मेश्राम, उपनिरीक्षक अभिषेक नवघरे सह होमगार्रूड तालुका समादेशक संगीता इंगळे रुट मार्च करिता उपस्थित होते.

रूट मार्च पोलीस स्टेशन ते गुरुवार पेठ बाजार रोड, मिश्री शाह बाबा दर्गा, गोंडवेस, मुजावर पुरा, शहा बाबू मैदान,विजबिरा मस्जिद, मोमीनपुरा,गुजरी लाईन मिरवणूक मार्गाने, खळकेश्वर वेताळ,पाटील मंडळी ,बाळापूर वेस, सिदाजी वेटाळ,भोई वेटाळ,साळणीपुरा,काशीद पुरा,चिरा चौक,मिलिंद नगर चौक,नगरपालिका समोरून, जुने बस स्टँड चौक,पोलीस स्टेशन पातूर येथे रूट मार्च समाप्त करण्यात आला. त्यामध्ये 7 पोलीस अधिकारी व नियंत्रण कक्ष चे ट्रेकिंग फोर्स ,आरसीपी व दंगल नियंत्रण मोबाईल वरील पोलीस अंमलदार स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार , व होमगार्ड सैनिक 26,असे एकूण 122 पोलीस अंमलदार, व होमगार्ड सैनिक यांनी सहभाग घेतला होता तसेच सदर रूट मार्चमध्ये पोस्टेच्या दोन्ही मोबाईल व दामिनी मोसा,पोस्टेचे बी एम, बीट मार्शल, यांनी सुद्धा सहभाग घेतला होता