दि.23/03/2024
पातूर : वाशिम-अकोला रोडवरील आनंदानी पेट्रोल पंपासमोर अंधश्रद्धेचा प्रकार उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
आज दि.23 मार्च 2024 रोजी सकाळच्या सुमारास वाशिम-अकोला रोडवरील आनंदानी पेट्रोल पंपासमोर असलेल्या वडाच्या बुंध्याला एका बाहुलीच्या पोटामध्ये खिळ्याच्या साहाय्याने निंबू ठोकलेले असून त्या बाहुलीला टाचण्या टोचलेल्या असून त्याच्याच बाजूला नारळ,कवळ्या काही डाळी व पूजेचे साहित्य जाळून अघोरी पूजा केल्याचे समोरील रसवंती चालक रणजित गाडेकर याच्या निदर्शनास आले असता त्याने भयभीत होऊन सदरची माहिती अनिसला दिली.
सदर माहितीवरून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून याची माहिती पातूर शहरातील अनिसचे तालुकाध्यक्ष पत्रकार दुले खान,पत्रकार प्रदिप काळपांडे यांना दिली असता त्यांनी सदर प्रकार हा जादूटोणा करण्याची मानसिकता असलेल्या विकृत व्यक्तीकडून करण्यात आला असून अशा प्रकारच्या अंधश्रद्धा मनात बाळगू नये व सदर प्रकारामुळे अजिबात भयभीत होऊ नये असे यावेळी सांगितले.
