डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला आयोजित शिवार फेरीस श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला (अंधारे)येथील विद्यार्थ्यांची भेट
पातुर प्रतीनिधी : (शिर्ला अंधारे)डाँ.पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला येथे २० ते २२ सप्टेंबर २०२४ या कालावधीत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिवार फेरीस डॉ. पं.दे.कृ.वि अकोला संलग्नित सुमित्राबाई अंधारे कृषि महाविद्यालय शिर्ला (अंधारे ) येथील ५० विद्यार्थ्यांनी २० सप्टेंबर २०२४ रोजी शिवार फेरीस भेट दिली.
शिवार फेरी भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी फळे, फुले व भाजीपाला या पिका संदर्भातील विविध तंत्रज्ञान व पीक प्रात्यक्षिके यासह इतर शेतीविषयकब तंत्रज्ञानाचा लाभ घेतला. या शिवार फेरीस कृषि महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. कृष्णा भाऊ अंधारे , संस्थेच्या सचिव तसेच विद्यापीठ कार्यकारी सदस्या सौ. हेमलता कृष्णाभाऊ अंधारे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम. खरडे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिवार फेरी यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकी शाखेच्या प्राध्यापक सोनल खवणे व उद्यानविद्या शाखेच्या प्राध्यापक डॉ. दिशा पाटील तसेच महाविद्यालयातील इतर शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.