पातुर शहरातील आठवडी बाजार येथील देशी दुकान च्या मागच्या इमारतीमधील खोल्यांना आग लागून मोठ्या प्रमाणात देशी दुकान चे बॉटल्स व पृष्ठांचे कागदी डबे जळून खाक झाले सविस्तर माहिती अशी आहे की पातुर येथील आठवडी बाजार येथे स्वर्गीय कालिखा यांची भली मोठी इमारत असून या इमारतीमध्ये कोणी राहत नाही

या इमारतीच्या आठवडी बाजाराच्या ठिकाणी देशी दारू चे दुकान असून या दुकानामधील खाली झालेले दारूच्या बॉटल चे डबे या इमारतीच्या प्रत्येक खोलीमध्ये कित्येक वर्षापासून ठेवण्यात आले यादरम्यान 21 फेब्रुवारी च्या रात्री एक वाजता च्या दरम्यान या पृष्ठांना आग लागल्याने प्रचंड प्रमाणात धूरीचे लोट निघत होते याची माहिती काही समाजसेवकांना कळताच त्यांनी सदर घटनेची माहिती पातुर पोलीस स्टेशनला दिली घटनास्थळी पातुर पोलीस अग्निशमन वाहन या ठिकाणी पोचले व तीन तास आग विजविण्याचा प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आली .

यावेळी पत्रकार दूलेखा, सुनील गाडगे, दिगंबर बंड, प्रदीप काळपांडे, गजानन वानखडे, मनोहर मते, राम मते, प्रल्हाद वानखडे अग्निशमन वाहक अश्फाक भाई मुदतशिर यांनी अथक प्रयत्न केले. या आगीमध्ये कोणाचीही जीवित हानी झाली नाही घटनास्थळी एपीआय सोळुंके होमगार्ड जितेंद्र चव्हाण वैभव गाडगे घटनास्थळी उपस्थित होते
