पातूर प्रतिनिधी:-
पातूर तालुक्यातील जांबवसु येथील शेतकऱ्यांना नवभारत फर्टीलायझर लि कंपनीकडून सेंद्रिय शेती करण्याचे आव्हान करण्यात आले. यावेळी कंपनी प्रतिनिधी विक्रम राठोड यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती कशाप्रकारे करतात व त्यांचे फायदे कसे असतात.तसेच रासायनिक शेतीचे नुकसान याबद्दल संपुर्ण मार्गदर्शन केले तसेच भविष्यात सेंद्रिय शेती किती महत्त्वाची आहे. याविषयी शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आज जमिनीचे आरोग्य घालवण्याचे कारण रासायनिक खतांचा अतिवापर आहे असे ते बोलत होते. त्यावेळी गावातील ,मनोज वसू अविनाश जाधव मनोज बोधणे रामदास जाधव व इतर शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.
