पातुर प्रतिनिधी:- शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाज सुधारक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती पातुर पोलीस स्टेशन येथे साजरी करण्यात आली.पातुर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला कुंमकुंम तिलक व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

हिम्मतराव डिगोळे यांनी ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकीत ज्योतीरावांनी आपल्या विचारांचा एक सुबोध व सुंदर सूत्रबद्ध,सारांश सांगितला. “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली,गतीविना वित्त गेले,वित्तविना शूद्र खचले इतके अनर्थ एका अविद्येने केले.त्यांनी हा निष्कर्ष शेतकऱ्यांचा आसूड”, सांगितला व विचार कार्याचे वाचन केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मभर लोकशिक्षणाच्या कार्यात सहभाग.सावित्रीबाई ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंत त्यादी जिवनावर प्रकाश टाकला.यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बंडूजी मेश्राम,खुपीया मेजर हिम्मतराव डिगोळे,पोलीस कर्मचारी हिरासिंग राठोड,दिलीप इंगळे,नंदनकर मेजर,डोंगर मेजर,महिला पोलीस अनिता चौधरी, तसेच महिला व पुरुष होमगार्ड क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित होते.