पातुर प्रतिनिधी :- अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण विद्यार्थी आघाडी च्या अध्यक्ष पदी वाडेगावं येथील रहिवासी मोहम्मद उमेर यांची निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय ना.अजित दादा पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय खासदार प्रफुल्ल भाई पटेल व मा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शना खाली विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष मा प्रशांत कदम पाटील यांच्या आदेशाने व अकोला ग्रामीण अध्यक्ष म्हणून कृष्णाभाऊ अंधारे यांच्या शिफारशी नुसार ही निवड करण्यात आली.११ जुलै रोजी राष्टवादी काँग्रेस
पक्षाच्या वतीने अधिकृत नियुक्तीपत्र सर्व पदाधिकाऱ्यांना सन्मानपूर्वक प्रधान करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर गुरुजी साखरकर, दीपक गावंडे जिल्हा उपाध्यक्ष, रामकुमार अमानकर सरचिटणीस, पवन गाढे,शंतनू वसु जिल्हा सरचिटणीस, शुभम तायडे, शुभम झांबरे, पृथ्वीराज गावंडे, शुभम तिडके,शुभम पाचपोर, यांचे सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांत अध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या पर्वावर वरील नियुक्त्या करण्यात आल्यात.
यानिमित्ताने महाविद्यालय तेथे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची शाखा उघडण्याचा संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय कृष्णा भाऊ अंधारे त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना याप्रसंगी आदेशीत केले.
दिनांक 14 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नामदार अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या चेतना महामेळावा या मेळाव्यासाठी बारामतीला विद्यार्थी राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहतील असे अभिवचन नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी या प्रसंगी दिले.
